मालवणात नगरपरिषदेकडून 'गणेशोत्सव २०२३' साठी बांधकाम विभागाची व आरोग्य विभागाची कामे युध्दपातळीवर सुरु ; मुख्याधिकारी व प्रशासक श्री संतोष जिरगे यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर नगरपरिषदेकडून ‘गणेशोत्सव २०२३’ साठी बांधकाम विभागामर्फत स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर सुरु झाली असून गणेश मूर्ती विसर्जन स्थळांकडील गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव विसर्जन स्थळांकडील पापडी दुरुस्ती कामे सुद्धा हाती घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे व गवत छाटणीचे कामही सुरु झाले आहे.
आरोग्य विभागाकडून डास प्रतिबंधात्मक फवारणी देखील सुरु केली गेली असून गणेशोत्सव २०२३ हा सण सुखकर साजरा होण्यासाठी मालवण नगरपरिषद प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे माध्यमांच्या मार्फत मालवण वासियांना दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.