ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी मसुरेतील विकासात्मक कामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले निवेदन ; आंगणेवाडीत सकारात्मक चर्चा संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी मसुरेतील विकासात्मक कामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले निवेदन ; आंगणेवाडीत सकारात्मक चर्चा संपन्न.

प्रकाशन: 10 Sep 2023 09:38 AM
वाचन संख्या 145
Article image

मसुरे | प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दुपारी आंगणेवाडी येथे येऊन श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय उर्फ छोटू ठाकूर यांनी मसुरे गावासहित परिसरातील गावातील विविध विकासात्मक प्रश्नांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. या भागातील प्रलंबित विविध विकासात्मक कामे प्राधान्याने पूर्ण व्हावीत यासाठी छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवाजी परब यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्राधान्याने मागणी केली. नामदार रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा छोटू ठाकूर यांच्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन आपल्या सोबत असणाऱ्या स्विस सहाय्यकाला छोटू ठाकूर यांच्या निवेदनाची त्वरित दखल घेण्याच्या सूचना करून ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत अशी सूचना केली. याप्रसंगी महेश बागवे यांनी सुद्धा विविध विकासात्मक प्रश्नांबाबत नामदार रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा विनिमय केला.

Article image

यावेळी छोटू ठाकूर यांनी मसुरे विभागाच्या वतीने नामदार रवींद्र चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, यासीन सय्यद, जितेंद्र परब, दया देसाई असे मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स