ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ तालुक्यातील १४ शिक्षकांचा शिक्षक भारती संघटनेत प्रवेश.

कुडाळ तालुक्यातील १४ शिक्षकांचा शिक्षक भारती संघटनेत प्रवेश.

प्रकाशन: 08 Oct 2021 04:31 PM
वाचन संख्या 41

ब्युरो न्यूज | प्राजक्ता पेडणेकर : कुडाळ तालुक्यातील १४ शिक्षकांनी शिक्षक भारतीच्या कार्यप्रणालीने प्रेरीत होऊन माणगांव – कुडाळ येथे शिक्षक भारती संघटनेत जाहीर प्रवेश केल्याची माहिती शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली.
शिक्षक श्री. नितीन गायकवाड, श्री. कृष्णा पानझाडी,श्री. विनायक हारगे, श्री. शशिकांत डांगरे, श्री. चेतन विल्हेकर, श्री. माधव थोटे, श्री. अमोल चेपूरवार,श्री. गंगाधर पवार, श्री. महेश लांडगे, श्री. वालाजी पाडवी,श्री. संजीव चौरे ,श्रीम.स्वप्नाली शिंदे, श्रीम. सुरेखा शिंदे यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी गेल्या चार वर्षातील शिक्षक भारतीच्या कामकाजाचे अवलोकन करून ही संघटना शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणे लढा देणारी जिल्ह्यातील संघटना असल्याने शिक्षकांचे प्रश्न शिक्षक भारतीच संघटना सोडवू शकते असे मत व्यक्त केले. तसेच जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे यांनी प्रवेशकर्त्या शिक्षकांना प्रत्येक समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. तसेच कुडाळ कार्याध्यक्ष श्री. योगेश देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी श्री. संतोष कोचरेकर, श्री. विनेश जाधव, श्री. दिनकर शिरवलकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स