ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
घोटगे गावात भाजपला धक्का ; माजी सरपंचासह अनेकजण शिवबंधनात..!

घोटगे गावात भाजपला धक्का ; माजी सरपंचासह अनेकजण शिवबंधनात..!

प्रकाशन: 08 Oct 2021 03:44 PM
वाचन संख्या 73

आम.वैभव नाईकांच्या विकासकामांच्या धडाक्याला साथ देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची माहिती..

घोटगे | ब्यूरो न्यूज : सलग दुसर्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय उलथापालथ पहायला मिळते आहे. काल कळसुली येथील अनेक शिवसेना कार्यकर्ते भाजपात दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आज जिल्ह्यातील घोटगे गावच्या मळेवाडी येथील माजी सरपंच सोनजी नाईक, गोपाळ नाईक ,दिलीप वाडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली सन्मानाने घालून आम. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

गेली अनेक वर्षे भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील गावात भाजप कडून विकासकामे केली जात नाहीत. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गावात विकास कामांचा धडाका लावला आहे. गावातील व्यक्तींसाठी आ. वैभव नाईक सहज उपलब्ध होतात. त्यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये लवू सूद, दिलीप वाडकर, अशोक नाईक, भिकाजी सूद, विठोबा सूद, उदय सूद, संतोष सूद, गोपाळ नाईक, सचिन नाईक, आबा परब,राजू परब, राज परब, नामदेव वाडकर, राकेश वाडकर, कल्पेश वाडकर,आदींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश सावंत, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, उपविभागप्रमुख राजू परब, घोटगे उपसरपंच गीतेश सावंत,घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, भावेश परब, यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला आहे.

    .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स