कासार्डे येथे उद्या ९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ह्यूमन एटीएम सेवेचा शुभारंभ..!
मान.सतिश सावंत अध्यक्ष तर माजी आमदार प्रमोद जठार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार.
कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्हा बँक एटीएम सुविधा उपलब्ध नसलेल्या शाखांच्या परिसरातील इतर बँकांची एटिएम असलेल्या ग्राहकांना एटिएम सुविधा मिळण्यासाठी ह्यूमन एटिएम सेवा कार्यान्वीत करीत असून, त्याचा शुभारंभ शनिवार दि. ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता बँकेच्या कासार्डे शाखेत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतिश सावंत, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद जठार माजी आमदार ( देवगड कणकवली मतदार संघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास सुरेश दळवी – उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, बाळाराम तानवडे – सरपंच कासार्डे, श्रीम. साक्षी सुर्वे – सरपंच तरळे , श्रीपत पाताडे – अध्यक्ष, कासार्डे विकास से.सो.लि., विनायक राणे – अध्यक्ष, तरळे विकास से. सो. लि.आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या शुभारंभ सोहळ्यास सर्वांनी उपस्थिच रहावे असे आवाहन अतुल काळसेकर ,
रामचंद्र मर्गज संचालक जिल्हा बँक,अनिरुद्ध देसाई
मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा बँक संचालक मंडळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)