आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याने मालवण एस टी आगारासाठी ४ आणि कुडाळ एस टी आगारासाठी १० नवीन बसेस मिळणार.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कुडाळ एस टी आगारासाठी एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने व सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते.
यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक