ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकार्यांनी नूतन जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांची घेतली सदिच्छा भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकार्यांनी नूतन जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांची घेतली सदिच्छा भेट.

प्रकाशन: 25 Aug 2023 12:35 PM
वाचन संख्या 243

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती ही जिल्ह्यात विविध समजभिमुख कार्य करत असून महिलांसाठी विविध प्रश्नांबाबत आवाज उठवत असते. नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या पूर्वी प्रशासकीय सेवा ही लोकाभिमुख केली असल्याने एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांची सेवा उत्तम राहील यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे यांनी दिली.

यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे, सचिव तन्वी सावंत, सदस्या सौ सुस्मिता राणे असे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स