ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
१५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छेडणार आंदोलन ; आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.

१५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छेडणार आंदोलन ; आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.

प्रकाशन: 25 Aug 2023 09:58 PM
वाचन संख्या 113

कणकवली | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बॅन्क अध्यक्ष सतीश सावंत यांनी आंबा,काजू बागायदारांच्या पीक विम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये पीकविमा उतरविला होता. त्याअंतर्गत १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र आता ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही. केंद्र व राज्य सरकराने विमा कंपन्यांचे विम्याचे हप्ते न भरल्याने नुकसानीची रक्कम देण्यात आलेली नाही. येणाऱ्या १५ दिवसांत हि रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास १२ सप्टेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.

पीक विम्याच्या कालावधीत डिसेंबर मध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा, काजूला आलेल्या मोहोराचे सुरुवातीला नुकसान झाले. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण, काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस पडत राहिला. तापमानदेखील अनेकदा ३७ अंश सेल्सिअस पेक्षा वाढले. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर फोंडाघाट, कुडाळ, आजगांव, सावंतवाडी, बिबवणे, तळेबाजार, माळगाव, वेंगुर्ला, म्हापण याठिकाणी असलेली हवामान केंद्रे तांत्रिक दृष्ट्या अयोग्य ठिकाणी असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हात सर्व ठिकाणी समान वातावरण असताना देखील हि केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान दाखवत आहेत. त्यामुळे अनेक पीक विमा धारक बागायतदार शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचीत राहिले आहेत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीप्रमाणे पीक विमा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स