ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ओरोस येथील युवकाची आत्महत्या..!

ओरोस येथील युवकाची आत्महत्या..!

प्रकाशन: 16 Aug 2023 08:56 PM
वाचन संख्या 223

ओरोस | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस देऊळवाडी येथील युवक निलेश उर्फ निलू आंगणे याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो २७ वर्षांचा होता. शेती आणि अन्य व्यवसाय असलेल्या कुटुंबातील सरळ स्वभाव व मैत्रीसाठी तो ओळखला जात होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

आज बुधवारी दुपारी जेवणानंतर आई वडील झोपत असलेल्या खोलीत झोपायला जातो असे सांगत त्याने २:३० च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आजी व त्याचा भाऊ सिद्धेश याने निलेश बाहेर दिसत नसल्याने शोधा शोध सुरू केली. त्यातून एक खोली आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. नंतर त्या खोलीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. व्यावसायिक रामदास आंगणे यांचा तो धाकटा मुलगा होता. निलेशच्या निधनानंतर दुखवटा म्हणून रिक्षा व टेंपो व्यावसायिक तसेच दुकानेही बंद राहिली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स