लोरे येथील शाहुराव उर्फ अण्णा पांडुरंग रावराणे कालवश.
पारले येथील सुप्रसिद्ध साठ्ये महाविद्यालय येथून अधीक्षक म्हणून झाले होते सेवानिवृत्त.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या लोरे येथेमील श्री शाहुराव उर्फ अण्ण पांडुरंग रावराणे ( वय ८८) ह्यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. शाहुराव हे मुंबईतल्या पारले येथील सुप्रसिद्ध साठ्ये महाविद्यालय येथून अधीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. रावराणे मंडळाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे बहुमूल्य योगदान होते व बरीच वर्ष ते कार्यकारी मंडळावर सक्रीय होते. वैभववाडी तालुक्याचे पाहिले सभापती लोरे गांवचे श्री आबाराव ह्यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
उद्या सकाळी ९ वा त्यांची अंत यात्रा लोरे येथील राहत्या घरातून निघेल अशी माहिती देण्यात आली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)