ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सुकळवाड मधील नाभिक बांधवांचा अनोखा सेवा आदर्श.

सुकळवाड मधील नाभिक बांधवांचा अनोखा सेवा आदर्श.

प्रकाशन: 17 Aug 2023 06:09 AM
वाचन संख्या 453

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील नाभिक बांधवांनी जनसेवेचा एक अनोखा आदर्श ठेवला आहे. २०१५ सालापासून सुकळवाड येथील नाभिक समाजाचे बांधव, कुडाळ तालुक्यातील अणाव इथल्या ‘आनंदाश्रय आश्रम’ येथील वृद्धांचे केस कापणे व दाढी करणे हे केशकर्तनाचे अत्यावश्यक काम दर महिन्याला तिथे जाऊन करतात ते सुद्धा संपूर्ण मोफत..!

तळगांव, कट्टा व सुकळवाड विभागातील नाभिक बांधव या सेवेत सहभागी असतात. अनाथ, निराधार व रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून ते हे कार्य करत आहेत. या सेवेतून लाभणार्या आशीर्वादामुळेच या बांधवांच्या पदरात सुख आणि समाधान आहे अशी त्यांची धारणा आहे.

या महिन्यात संदीप सुभाष चव्हाण, दीपक लाड, गणेश कदम, संतोष कदम, सुभाष चव्हाण, किशोर लाड, उर्फ पप्पू चव्हाण व नाभिक बांधवांनी ‘आनंदाश्रय आश्रम’ इथे जनसेवा केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स