ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पंच परीक्षेत गोविंद उर्फ बंटी केरकर यांना यश ; पुणे येथे होणाऱ्या नेक्स्ट लेवल परीक्षेसाठी साठी पात्र.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पंच परीक्षेत गोविंद उर्फ बंटी केरकर यांना यश ; पुणे येथे होणाऱ्या नेक्स्ट लेवल परीक्षेसाठी साठी पात्र.

प्रकाशन: 08 Aug 2023 01:04 PM
वाचन संख्या 98

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे गोविंद ऊर्फ बंटी केरकर यांनी क्रिकेट मधील पंचगिरी क्षेत्रात आणखीन एक टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोविंद उर्फ बंटी केरकर यांनी यश मिळवले आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील दिनेश कुबडे ( सावंतवाडी ), वल्लभ घोटगे (दोडामार्ग ), मनोज कुडाळकर ( कुडाळ ) या चार पंचांना असे यश प्राप्त झाले आहे.

आता या चारही पंचांची पुणे येथे २५ आणि २६ ऑगस्टला होणाऱ्या Viva / video / presentation exam ( नेक्स्ट लेवल परीक्षा) साठी निवड झालेली आहे. गोविंद ऊर्फ बंटी केरकर व इतर यशस्वी पंचांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी, खेळाडू व तज्ञांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स