ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
इम्रान ख़ान तोशाखाना प्रकरणी झाले 'हिट विकेट..!' ; ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

इम्रान ख़ान तोशाखाना प्रकरणी झाले 'हिट विकेट..!' ; ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा.

प्रकाशन: 05 Aug 2023 03:00 PM
वाचन संख्या 116

ब्युरो न्यूज : स्वतःच्याच देशाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याच्या आरोपावरून, विलासी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान ख़ान तोशाखाना प्रकरणी आज तीन वर्षांच्या कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे आता इम्रान ख़ान हे पाच वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. २०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान ख़ान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता. या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते काही कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

या निकालानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या राजकीय मंडळींच्या राष्ट्रीय निष्ठेविषयी कडक धोरण अवलंबले पाहिजे असे तेथील स्थानिक सामाजिक व राजकीय तज्ञांनी सूचीत केले आहे. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान ख़ान हे स्वतःच्याच देशाचे नुकसान करणे व शिक्षा जाहीर होणे यामुळे ‘हिट विकेट’ तथा स्वयंचित झाल्याचे बोलले जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स