ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हा बँके कडून बांदिवडे सोसायटीचा झाला गौरव.

जिल्हा बँके कडून बांदिवडे सोसायटीचा झाला गौरव.

प्रकाशन: 05 Aug 2023 03:15 PM
वाचन संख्या 140

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या बांदिवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम  शेअर्स देवून गौरविण्यात आले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेने १००% वसूली केल्या बद्दल हा गौरव करण्यात आला.

हा गौरव म्हणजे सोसायटी संचालक मंडळ व सर्व सभासदांचा गौरव असून यापुढे सोसायटीला प्रगती पथावर नेण्याचा व उलाढाल वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन प्रफुल्ल प्रभू म्हणाले. यावेळी चेअरमन प्रफुल्ल प्रभू, व्हाईस चेअरमन सतीश बांदिवडेकर, शंकर आईर, शत्रुघ्न आईर, किरण पवार, सुनील घाडी, प्रवीण नाटेकर तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य सोसायटींचे संचालक, चेअरमन उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स