मनापासून पर्ल ऊर्फ मोती..
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात गरडा म्हणून एक मैदान आहे..तिथे २००१ साली एका खेळाडूचा हात दुखावला ..नंतर खूप शस्त्रक्रिया सहन केल्या त्या खेळाडुने..
अरे तुरे त्या खेळाडूला कोणीही करत नाही..’अण्णा कारेकर’..!
कोल्हापूरातील खूप मोठ्या हाॅटेलचे शेफ ते “आमचे अण्णा” प्रवास थक्क करुन टाकेल.
फ्रॅचायझी क्रिकेट २००७ साली आलं पण त्याही पूर्वी अण्णा इलेवन नावाचा संघ घेऊन हा मालक लहान मोठ्यांना संधी देत राहीलेला.
हल्ली अण्णा बोर्डिंग ग्राऊंडवर सकाळी न चुकता हजर असतात..अण्णा कारेकर यांचे दोन पुतणे अमित व किरण..सोबत चालले तर कोण पुतण्या व काका व्यक्ती व्यक्तिमत्व कळणारही नाही.
२००१ साली बोर्डिंग ग्राऊंडवर तुटलेल्या बोटांनी हनुचा कॅच..आणि ज्याला आपण दिलशान तिलकरत्नेचा “दिल स्कूप” म्हणतो..तो खरंतर अण्णांचा आहे.
साधे आहेत ते..फक्त क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे अण्णांना मनापासून शुभेच्छा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)