निसर्गकवीचे पंचत्वात प्रस्थान!
निसर्गकवी अशी ओळख असणारे श्री.ना.धों.महानोर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
मातीशी एकरूप झालेला हा हाडाचा शेतकरी श्रमातून आणि शब्दातूनही मातीशी ईमान राखून होता.’पानझड’,’तिची कहाणी’,रानातल्या कविता’या त्यांच्या कवितासंग्रहांनी रसिकमनावर घातलेली मोहिनी चिरंतन राहील. यशवंराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.साहित्याशी मातीचे भावबंध जोडणारा कवी काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मराठी साहित्यक्षेत्राची मोठीच पडझड झाली आहे. त्यांचे शब्दरंगभान सिद्ध करणारी ही त्यांची कविता आठवून त्यांना ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॕनेल’ विनम्र श्रद्धांजली अर्पण करत आहे.आदरांजली ना. धो. महानोर. 💐—भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गंबाई, श्रावणाचं ऊन मला झेपेनापिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेनाबाई, श्रावणाचं ऊन मला झेपेनानिळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरीवाट पाहिली डोळां चळ थांबेनाबाई, श्रावणाचं ऊन मला झेपेनाश्रावणाच्या सरी पानभरी थर्थरीहिर्व्या मोराची थुईथुई थांबेनानिळ्या मोराची थुईथुई थांबेनाबाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना- ना. धो.महानोर
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)