ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळगांव मध्ये 'कोकण कला व शिक्षण विकास' संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; गरजू मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप.

साळगांव मध्ये 'कोकण कला व शिक्षण विकास' संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; गरजू मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप.

प्रकाशन: 02 Jul 2023 08:10 AM
वाचन संख्या 161

बांदा | राकेश परब : गेली ११ वर्षे ‘कोकण कला व शिक्षण विकास’ संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, पालघर , बीड , ठाणे , पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित केली जातात. विविध सामाजिक उपक्रम करत असताना ज्या गरजू मुलांना शिकण्याची इच्छा आहे मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा शेकडो मुलांना कोकण संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य म्हणून दफ्तर व वह्या वाटप केले जाते.

३० जूनला कुडाळ तालुक्यातील शिवराज मराठा व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगांव या प्रशालेत शिकणाऱ्या १० गरजू व हुशार मुलांना कोकण संस्थेच्या वतीने दफ्तर व वह्या वाटप करण्यात आल्या . या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी कोकण संस्थेचे समन्वयक श्री. समिर शिर्के, श्री. हनुमंत गवस ( समन्वयक -कोकण संस्था), श्री. विद्यानंद पिळणकर, श्री. विश्वास धुरी , श्री. आनंद हळदणकर , श्री. राहुल कानडे अए शिक्षक व शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सलीम टकीलदार, श्री.प्रदीप प्रभूतेंडोलकर (संस्था अध्यक्ष), श्री.मुकुंद धुरी (सचिव) अन्य संस्था पदाधिकारी ,शिक्षक यांनी कोकण संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स