ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात उद्या 'गुरूपोर्णिमा उत्सव' निमित्त  विविध कार्यक्रम.

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात उद्या 'गुरूपोर्णिमा उत्सव' निमित्त विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 02 Jul 2023 07:08 AM
वाचन संख्या 320

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने भाविक स्वामींच्या दर्शनाकरीता पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी करतात अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दि.३ जुलै रोजी आहे. या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नित्यनियमाने होणारी काकड आरती पहाटे ५ वाजता होईल. दर्शनाकरीता या दिवशी स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. स्वामी भक्तांची संभाव्य गर्दी पाहून सर्व स्वामी भक्तांना विशेष दर्शन रांगेची सोय करण्यात आली असून या दर्शन रांगेतूनच स्वामी भक्तांना स्वामी दर्शनास सोडण्यात येईल. स्वामी भक्तांच्या संभाव्य गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. या दिवशी जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. दुपारी ११:३० वाजता चोळप्पा महाराजांचे वंशज पुरोहीत मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवून नैवेद्य आरती संपन्न होईल व शेजारती रात्री ७:४५ ते ८:४५ यावेळेत संपन्न होईल. गुरूपौर्णिमेनिमीत्त दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या वतीने मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.

सर्व भाविकांनी स्वयंशिस्तीने व भक्तीभावाने श्रींच्या दर्शनाचा, भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 441

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स