ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नेरुर मध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री देव कलेश्वर मंदिरात अभिषेक, पूजन व गार्हाणे..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नेरुर मध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री देव कलेश्वर मंदिरात अभिषेक, पूजन व गार्हाणे..!

प्रकाशन: 13 Jun 2023 06:07 PM
वाचन संख्या 706

देवेंद्र गावडे | उपसंपादक : आज १३ जून हा महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन-पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जन्मदिवस. त्यांचा हा जन्मदिवस महाराष्ट्रभर विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील व विभागातील युवासेना तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने यानिमित्ताने नेरूर गावचे ग्रामदैवत श्री देव कलेश्वर मंदिर येथे अभिषेक व पूजन करण्यात आले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना निरंतर उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य तसेच सामाजिक व राजकिय क्षेत्रात उत्तुंग यशकिर्ती लाभावी म्हणून ‘श्रीं”च्या चरणी गा-हाणे सुद्धा देण्यात आले.

यावेळी नेरुर गावच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगांवकर, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रा.प. सदस्य प्रविण नेरूरकर, ग्रा.प. सदस्य मंजूनाथ फडके, ग्रा.प. सदस्य रोशनी नाईक, ग्रा.प. सदस्य संतोष कुडाळकर, मा.ग्रा.प. सदस्य प्रसाद गावडे, विजय लाड, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ गावडे काका, युवासेना कुडाळ उप तालुका प्रमुख विनय गावडे, शिवसैनिक, व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स