ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आय.एम.एस.ही एक मोठी दृष्टी असलेले शिक्षण संकुल : इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक सचिव डॉ.अमोल जोशी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आय.एम.एस.ही एक मोठी दृष्टी असलेले शिक्षण संकुल : इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक सचिव डॉ.अमोल जोशी.

प्रकाशन: 12 Jun 2023 05:06 PM
वाचन संख्या 187

प्रथमेश इंगळेंच्या यशाच्या सन्मानाची प्रशंसा करताना व्यक्त केले मनोगत.

अक्कलकोट | प्रतिनिधी : आय.एम.एस.मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तकाच्या पानावरील अक्षरांच्या पलीकडे जाते. म्हणून आमचे विद्यार्थी एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या आत्मविश्वासाने तरुण व्यक्ती म्हणून उदयास येतात. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि शिकण्यासाठी प्रेरित करतो. आम्ही त्यांना कौशल्ये, धैर्य, आशावाद आणि त्यांच्या स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रामाणिकपणा देतो. असे केल्याने, आमचे विद्यार्थी तरुण आणि सृजनशील व्यक्ती बनतात. जे जीवनात मनोरंजक आणि आव्हानात्मक करिअर घडवून आमच्या आय.एम.एस.शिक्षण संकुलाचे नावलौकिक वाढवतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक सचिव डॉ.अमोल जोशी यांनी केले. आज अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे यांनीही मार्च २०२३ मध्ये विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षणात भरघोस यश संपादन करून अक्कलकोट आय.एम.एस.महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल डॉ.अमोल जोशी यांनी प्रथमेश इंगळे व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. याप्रसंगी डॉ.अमोल जोशी बोलत होते.

पुढे बोलताना डॉ.अमोल जोशी यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात प्रथमेशने इंगळे कुटुंबाचेही नावलौकिक वाढवले आहेच. या पुढील व्यावसायिक शिक्षणात ही प्रथमेशने यापेक्षा मोठे यश संपादन करून त्यांच्या वडिलांप्रमाणे प्रथमेशनेही सर्व समावेशक-सुसंस्कृत, आदर्श व प्रतिष्ठित नागरिक म्हणून उदयास यावे असेही आवाहन प्रथमेश इंगळे यांना डॉ.अमोल जोशी यांनी केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, डॉ.अमोल जोशी, मुख्याध्यापिका गौरी दातार, महाविद्यालयाचे प्राचार्य गणपती वाघमोडे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स