किल्ले रायगडावरील चित्त दरवाज्याजवळ कोसळली दरड ; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान.
ब्युरो न्यूज | रायगड : महाराष्ट्र राज्यातील अत्यंत मानाच्या किल्ले रायगड येथील चित्त दरवाज्याजवळ आज संध्याकाळी ४ वाजता एक मोठी दरड कोसळली. मोठा पाऊस पडून गेल्यानंतर काही मिनिटांतच ही घटना घडली. आज महाड व पोलादपूर मध्येही जोरदार पाऊस पडला असून रायगड परिसरातही पावसाची चांगलीच सुरवात झाली आहे.
चित्त दरवाज्या समोरुन जाणार्या ३ वाहनांवर ही दरड कोसळली आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणतीही मनुष्य प्राण हानी झाली नाही.
घटनास्थळी महाड तालुका पोलिस जाण्याचे सहाय्यक निरिक्षक श्री. अवसरमोल यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवली आणि चित्त दरवाज्या समोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)