कुडाळ भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा ; पक्ष संघटनेत कार्यरत रहाणार असल्याचे केले नमूद.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. आपला राजीनामा त्यांनी तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्याकडे दिला आहे. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तरी यापुढेही ते पक्ष संघटनेत सदैव कार्यरत राहीन असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)