ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पर्यटन,सामान्य नागरीक आणि वीज समस्या..!

पर्यटन,सामान्य नागरीक आणि वीज समस्या..!

प्रकाशन: 08 Jun 2023 06:11 PM
वाचन संख्या 334

सुयोग पंडित | मुख्य संपादक : न्यूयाॅर्कमध्ये दहशतवादी हल्ल्यात ट्वीन टाॅवर्स जमीनदोस्त झाले तरी तिथला वीज व जल पुरवठा खंडित झाले नव्हते हे विशेष..! आता हे उदाहरण संपूर्ण दुःखाची किनार असलेले आहे तरी एक गोष्ट महत्वाची की नागरीकांसाठीच्या मूलभूत सोयींची जी काळजी घेतली जाते हे ते एक उत्तम उदाहरण आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पृथ्वीवरील क्षेत्रात शाश्वत प्रगतीसाठी शाश्वत पर्यटन हा एक सर्वात महत्वाचा रोजंदारीचा तथा उदरनिर्वाह करायचा मार्ग आहे. शाश्वत पर्यटनाबाबत जागतीक स्तरावर जागृती होत आहेच परंतु पाणी व वीज हे दोन घटकसुद्धा पर्यटनासाठी अत्यावश्यक आहे व ती जबाबदारी स्थानिक यंत्रणांनी प्राधान्याने निभावणे हे प्राथमीक कर्तव्य आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता, गेल्या १० वर्षात राज्यातील विविध पर्यटन क्षेत्रांच्या प्रगतीचे प्रयत्न हे ‘सर्वपक्षीय आमदार व खासदारांनी’ आपापल्यापरिने प्राधान्याने केल्याचे लक्षात येईल. म्हणजेच पर्यटनासाठी मंच जरुर मिळतोय परंतु त्यावरील पुढील कर्तव्य ही नेमून दिलेल्या यंत्रणांच जबाबदारी आहे.

वीज…ही एक समस्या पर्टनवाढीसोबत आणखीन जास्त सजगतेने हाताळायची गरज आहे. ‘कर्मचारी कमी असणे…सामुग्री जुनी झालीय…’ वगैरे आता कालबाह्य ठरणारी कारणे झालीत कारण पर्यटन क्षेत्रांना आता मागे वळून पहायला वेळ नाही. वीज समस्येमुळे शेतकरी वर्ग जसा होरपळून निघतो तसाच पर्यटन क्षेत्रांतील लहान मोठा व्यापारी सुद्धा अक्षरशः हतबल होतो. विजेवर चालणार्या उपकरणांची वाट लागते आणि सोबतच रेफ्रीजरेटर सारखी उपकरणे वारंवार नादुरुस्त होतात. रेफ्रीजरेटर मधील शितपेये, नाशवंत पदार्थ यांच्या नुकसानीला कुठलेही पॅकेज नसते. सरळ भाषेत सांगायचे तर हाॅटेल व लाॅजिंग व्यावसायिक व्यवसायासाठी कर्ज काढून थकेल परंतु स्वतःच्या भविष्यासाठी पाच पैसेही बॅन्केत वेगळे साठवू शकणार नाही.

पर्यटन क्षेत्रासोबतच विद्यार्थी वर्ग आणि घरगुती वापरातील वीजेवर चालणारी उपकरणे हे घटकसुद्धा वीजेच्या लपंडावामुळे हताश होतायत हे सत्य वीज यंत्रणेला कळणे आवश्यक आहे. राज्यात अजून अख्खा पावसाळा जायचाय…त्याआधीच या सर्व घटकांवर नियमित काम होणे आवश्यक आहे. ‘सौर ऊर्जा’ जर यावर उपाय असेल तर तो निदान पर्यटन क्षेत्रांतील लहान मोठ्या व्यवसायिकांना निःशुल्क मार्गदर्शनासोबत वाजवी दरात उपलब्ध व्हावा तरच पर्यटन क्षेत्रांची ‘प्रगती’ शक्य आहे.

‘लोकांचा क्षोभ’ होण्या ऐवजी वीज यंत्रणेतील सर्वांनीच ‘लोकांचा लोभ’ कसा वाढेल त्यासाठी ‘झटणे’ आवश्यक आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स