ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बिपरजॉय चक्रीवादळ. हवामान खात्याचा सावधगिरीचा इशारा 08-10 जून: महाराष्ट्र, पुणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस पडेल.11-12 जून: मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल. कोकणात महापूर येण्याची शक्यता.

बिपरजॉय चक्रीवादळ. हवामान खात्याचा सावधगिरीचा इशारा 08-10 जून: महाराष्ट्र, पुणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस पडेल.11-12 जून: मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल. कोकणात महापूर येण्याची शक्यता.

प्रकाशन: 07 Jun 2023 11:26 PM
वाचन संख्या 60

मुबई प्रतिनिधी /भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात खोल दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याचे रूपांतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळात झाले. पुढील काही तासांत हे वादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर व्यतिरिक्त कोकणातील किनारपट्टी भागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

मच्छिमारांना मच्छिमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. पुढील 48 तासांत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ या हंगामात अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ 8,9 आणि 10 जूनला महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार आहे. कोकण, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स