ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा नेते व माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश ; कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा होणार धार्मिक पर्यटनाधिष्ठीत विकास...!

भाजपा नेते व माजी खासदार डाॅ.निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश ; कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा होणार धार्मिक पर्यटनाधिष्ठीत विकास...!

प्रकाशन: 30 May 2023 09:30 PM
वाचन संख्या 610

प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन सचिवांनी दिले आदेश.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक अधिष्ठान व आस्थेची सुबत्ता लाभलेल्या कुडाळ तालुक्यातील प्रमुख २३ देवस्थान परिसरांच्या विकासासाठी भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी विशेष संवाद साधत या देवस्थान परिसरांच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रादेशिक पर्यटन संचलनालयाच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा विकास आराखडा बनवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक पर्यटन संचलनालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लवकरच अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून कुडाळ तालुक्यातील देवस्थान परिसरांचा विकास होणार आहे.

या अंतर्गत आता श्री देव कुडाळेश्वर मंदिर कुडाळ, श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस बुद्रुक, श्री सिद्ध महादेव मंदिर केरवडे कर्याड नारूर, श्री लिंग रवळनाथ मंदिर पोखरण, देवी भगवती मंदिर आंब्रड, श्री देव गिरोबा मंदिर भडगाव, श्री देवी भराडी मंदिर वाडीवरवडे, श्री देवी भावई मंदिर गोठोस, श्री देव जटाशंकर मंदिर मंदिर नेरूर कर्याद नारूर, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर वालावल, श्री देव स्वयंभू महादेव मंदिर पांग्रड, श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर इत्यादी देवस्थान परिसरांचा विकास पहिल्या टप्यात होणार आहे.

माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या या प्रयत्नांमुळे कुडाळ परिसरातील देवस्थान विकासासोबत सुनियोजित आस्थेची जपणूक व सुसज्ज धार्मिक पर्यटनालाही भरीव हातभार लागणार असल्याचे मत सामाजिक तसेच अध्यात्मिक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स