कोकीसरेत भीषण अपघात ; एक जण जागीच मृत्युमुखी..!
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या कोकिसरे बेळेकरवाडी येथे आज मंगळवारी ३० मे रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला ट्रक व दुचाकीत भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार स्वार जागीच मृत्युमुखी पडला. वैभववाडीहून तळेरे च्या दिशेने जाणार्या ट्रक व दुचाकी यांच्यात हा अपघात झाला . दुचाकीस्वार जयताराम हेमाराम सोळंकी (वय २६) मुळगांव राजस्थान व सध्या राहणार वैभववाडी महालक्ष्मी कॉम्प्लेक्स हे वैभववाडीच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला, ट्रकने जोरदार धडक दिल्याने सोळंकी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे ते जागीच मयत झाले.
याबाबत ट्रक चालका विरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्ती ही कोकिसरे नारकरवाडी येथील महादेव मार्बलचे मालक यांचे मेव्हणे होत. महादेव मार्बलचे मालक कामानिमित्त गावी गेल्यामुळे दुकान सांभाळण्यासाठी मयत सोळंकी हे आले होते. कामानिमित्त वैभववाडी येथे ऍक्टिवा गाडीवरून जात असताना हा अपघात घडला. या अपघाताचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)