आमदार वैभव नाईक पुन्हा आक्रमक ; सतीश सावंतांसह उद्या घेणार जि.प.मुख्य कार्यकाऱी अधिकाऱ्यांची भेट
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक). आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध असणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. हा गंभीर प्रश्न असून याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत हे उद्या बुधवार दि. २४ मे रोजी सकाळी ११:०० वाजता ओरोस येथे जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)