ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्याला संकट दिसले…म्हणून रिफायनरी कळली....

त्याला संकट दिसले…म्हणून रिफायनरी कळली....

प्रकाशन: 24 May 2023 05:00 AM
वाचन संख्या 202

मालवण | सुयोग पंडित : ( मुख्य संपादक) : रिफानरी विचार आला का पहिलं नांव गाडगीळ सैद्धांतिक गाडगीळ समिती येते.

आज त्याच गाडगीळ सरांचा वाढदिवस आहे. अभ्यास व चिंतन यांना दऱ्याखोऱ्या, नद्या, वने, अशा क्षेत्रांत हिंडून प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत असत. भारतातील पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय आणि विदेशांतील उत्तर दक्षिण अमेरिका जोडणारा पनामा, उत्तर-पूर्व अमेरिकेतील न्यू इंग्लंड, ॲरिझोना, पूर्व आफ्रिका येथे गाडगीळांनी अभ्यासासाठी प्रवास केला.

सत्तावीस विज्ञान महाविद्यालये, अनेक विज्ञान संस्था आणि विभाग, स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने सहा राज्यांतील दीड लाख चौ. किमी एवढ्या विस्तृत पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात त्यांचे प्रशासकीय कौशल्यही दिसले.

गाडगीळांनी आयुष्यात अनेक पारितोषिके, पुरस्कार, सन्मान मिळवले. त्यातील काही महत्त्वाचे नागरी पुरस्कार म्हणजे भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आय.सी.एस.एस.आर. तर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

द एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूटने (TERI – पूर्वीचे नाव टाटा एनर्जी रिसर्च इंस्टिट्यूट) प्रमुख म्हणून गाडगीळांना आणि त्यांच्या पश्चिम घाट परिस्थितिकी तज्ज्ञ समिती सदस्यांना ( WGEEP, गाडगीळ कमिशन) पुरस्कार दिला. तो निकोलस रोजन यांच्या स्मरणार्थ पर्यावरणाबद्दल जीवअर्थशास्त्रासंबधी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी असतो. सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला. त्यासाठी झालेल्या त्यांच्या नामांकन शिफारसपत्रात गाडगीळांनी भारतात पर्यावरण क्षेत्रात केले तेवढे कार्य अन्य कोणी केलेले नाही असे नोंदले आहे.

गाडगीळांनी जीवशास्त्र, पारिस्थितीकी, उत्क्रांतीशास्त्र अशा क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी २२५पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. सहा इंग्रजी पुस्तकांचे ते लेखक आहेत. सामान्यांसाठी मराठी, कानडी आणि इंग्रजी भाषांतून विपुल लिखाण आणि भाषणे केली आहेत. त्यांचे समाजोपयोगी संशोधन, मार्गदर्शन आणि विज्ञानप्रसाराचे त्यांचे कार्य अथकपणे सुरू आहे

लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. .

जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो.

माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत.

माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग' जाणीवेतील दोन प्रेरणास्रोत ; जयेश परब व मंगेश परब.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेसाठी 'राष्ट्रीय क...

21 Jul 2026 283

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स