ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बुधवळ्यात भाजपचा रिव्ह्यू गेला वाया ; खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा शुद्ध  'फेअर प्ले' सुरुच..!

बुधवळ्यात भाजपचा रिव्ह्यू गेला वाया ; खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा शुद्ध 'फेअर प्ले' सुरुच..!

प्रकाशन: 23 May 2023 02:57 PM
वाचन संख्या 269

खुद्द बुधवळे सरपंचांनी खासदार विनायक राऊत आणि जनतेचे आमदार वैभव नाईकांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्ले ऑफ टाॅपर

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातून मोठी राजकीय घडामोडीचा दावा करताना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी थेट मुद्याशीच विचारपुस केली.


बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र आज बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी स्वतः कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले. मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे.त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीची माहिती देणारे भाजप पदाधिकारी तोंडावर पडले आहेत.

यावेळी खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी संतोष पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी अशा तुच्छ राजकीय खेळीवर प्रतिक्रिया देताना म्हणले आणखिन किती “नीच” पातळी खणणार विरोधक. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक यांनी सांगितले की आमदार वैभव नाईक व आमचा ‘फेअर प्ले’..म्हणजे शुद्ध राजकारण सुरुच राहणार.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स