ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डॉक्टर बापू भोगटे यांना आणखीन एक सन्मान..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डॉक्टर बापू भोगटे यांना आणखीन एक सन्मान..!

प्रकाशन: 09 May 2023 07:43 PM
वाचन संख्या 37

दिपाली कदम /पुजारे ( मुंबई मुख्य संचालक ,सहसंपादक ) : कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ बापू भोगटे यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे.

प्रथितयश शेतकरी असणारे डॉ. बापू भोगटे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कोकणातील देवस्थान आणि रूढी, प्रथा परंपरा यातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. निसर्ग, त्यातील जीवसाखळी यातील त्यांचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. रांगणा गडाच्या परिसरात बिजारोपण करून स्थानिक वृक्षांची रोपे तिथे रुजवणे आणि त्याची काळजी घेण्याचा उपक्रम मागील आठ वर्षे ते सातत्याने राबवत असून यंदाही ४ जूनला त्यांनी हा कार्यक्रम निश्चित केला आहे. कविता, लेख आदी साहित्यप्रकारातून त्यांनी कोकणी चालीरिती, निसर्ग अत्यंत उत्कृष्ट आणि ओघवत्या भाषेत रेखाटला आहे. सामान्यांमधल्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा गौरव अखिल भारतीय साहित्य परिषदेने केला आहे. डॉ बापू भोगटे यांचा आरोग्य, शिक्षण यासह सर्वच सामाजिक क्षेत्रात असणारा मित्रपरिवार फार मोठा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या सुपुत्राच्या सन्मानाबद्दल जिल्ह्यात सर्वच स्तरावर आनंद व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स