ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
२० मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायच्या खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या सक्त सूचना.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

२० मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायच्या खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या सक्त सूचना.

प्रकाशन: 24 Apr 2023 09:26 PM
वाचन संख्या 235

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी ‘अणाव घाटचेपेडवाडी ते मांजरेकरवाडी’ येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे पूल मंजूर केले आहेत. यासाठी २ कोटी ६५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र ठेकेदाराने हे काम रखडवले असल्याने आज या पुलाच्या कामाची पाहणी खासदार विनायक राऊत व आ वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. अधिकारी व ठेकेदाराच्या कामावर नाराजी व्यक्त करत २० मे पर्यंत पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सक्त सूचना खासदार विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के. के. प्रभू यांना दिल्या आहेत.

त्याचबरोबर गेली अनेक वर्षे मागणी असलेल्या कर्ली नदीवर तळगाव बाव येथे नवीन पुलाचे काम प्रस्तावित आहे या प्रस्तावित असलेल्या पुलाच्या जागेची पाहणी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. लवकरच या पुलाच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अणाव घाटचेपेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, बाळू पालव, सरपंच लीलाधर अणावकर, बाबा परब, गजानन कुलकर्णी, अर्थव अणावकर, समीर आंगणे, विकास अणावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपभियंता के. के. प्रभू , आर. एच. पवार उपस्थित होते.

तळगांव येथे सरपंच लता खोत, उपसरपंच संतोष पेडणेकर, माजी उपसरपंच प्रसाद दळवी,तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश दळवी, वासुदेव दळवी ,यशंवत तळगांवकर,दाजी दळवी प्रशांत दळवी,दिलीप दळवी व गावातील अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स