ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खुल्या व शालेय गटाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने खुल्या व शालेय गटाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 25 Apr 2023 10:50 AM
वाचन संख्या 208

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे, श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या’ वतीने रविवारी दिनांक १४ मे रोजी शालेय व खुल्या गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ३ ते ४ मिनिटे आहे. इयत्ता पाचवी ते आठवी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ४ ते ५ मिनिटे ठेवण्यात आला आहे. खुल्या गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रशासन’ किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे अर्थकारण’ हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी ६ ते ७ मिनिटे वेळ ठेवण्यात आला आहे.

ही स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ येथे होणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना देखील रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

यावेळी प्रतिष्ठानने अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, जे. डी. पाटील, अक्षय मयेकर, अनुप बांदेकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, तनिष मेस्त्री, मिताली सावंत आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) किंवा अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) यांच्याशी संपर्क साधावा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स