ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा नेते व माजी खासदार डाॅ.  निलेश राणेंची वचनपूर्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा नेते व माजी खासदार डाॅ.  निलेश राणेंची वचनपूर्ती.

प्रकाशन: 24 Apr 2023 08:28 PM
वाचन संख्या 188

पोखरण वरचीवाडी मोरी बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून ८ लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे भाजपा नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे काही दिवसांपूर्वी कुडाळ दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन करण्याकरीता पोखरण येथे भेट दिली होती. यावेळी पोखरण येथे महापुरुष वरचीवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावरील खचलेल्या मोरीची पहाणी निलेश राणे यांनी यावेळी केली होती.  किमान ३५० लोकवस्तीच्या या भागाचा मोरी खचल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटणार होता.

त्यावर पोखरण ग्रामस्थांनी तातडीने या मोरी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यानुसार तातडीने केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देत निलेश राणे यांनी पोखरण ग्रामस्थांची समस्या मार्गी लावली आहे त्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स