ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत ठाकरे गटाला भाजपचा धक्का..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीत ठाकरे गटाला भाजपचा धक्का..!

प्रकाशन: 24 Apr 2023 07:37 PM
वाचन संख्या 335

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, रवींद्रजी चव्हाण,आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी ठाकरे गटाच्या ३ विद्यमान नगरसेवक भाजपात सामिल.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाभवे नगरपंचायत चे शिवसेना ठाकरे गटाचे दोन विद्यमान नगरसेवक श्री. प्रदीप रावराणे व नगरसेविका सौ. श्रद्धा रावराणे व ठाकरे गटाला समर्थन असणारे अपक्ष नगरसेवक श्री सुभाष रावराणे यांच्यासहित शिवसेना ठाकरे गट वैभववाडी युवा तालुकाप्रमुख श्री रोहित रावराणे यांचा भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश झाला.

हा प्रवेश केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण व कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीची नगरपंचायतीची मधील ताकद अधिक प्रबळ झाली आहे.

या प्रवेशाच्याप्रसंगी श्री.संताजी रावराणे,आशिष रावराणे,श्री.प्रशांत रावराणे आदी उपस्थितीत होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स