ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी ५० लाख रु. निधी मंजूर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ तालुक्यातील रस्त्यांसाठी ३२ कोटी ५० लाख रु. निधी मंजूर.

प्रकाशन: 13 Mar 2023 06:31 PM
वाचन संख्या 77

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील ११ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ३२ कोटी ५० लाख रु. निधी मंजूर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये कुंदे कदमवाडी नाटेकरवाडी आंब्रड परबवाडी रस्ता (ग्रा.मा.-९५ व ८९) ४.४७५ किमीसाठी ४ कोटी ३९ लाख, घावनळे रामेश्वर मंदिर खुटवळवाडी रस्ता ( ग्रा.मा.-२४५ ) ३.७०० किमीसाठी ३ कोटी ५२ लाख, हिर्लोक हातेरी रांगणा तुळसुली रस्ता ( ग्रा.मा.- २५१) २.७५० किमीसाठी २ कोटी ९० लाख, पुळास बाबरवाडी दुकानवाड रस्ता ( ग्रा.मा.-२०८) ४.८०० कमीसाठी ४ कोटी ६२ लाख, घोडगे सोनवडे पवारवाडी लाडवाडी रस्ता ( ग्रा.मा.-९) ४ किमीसाठी ३ कोटी ९५ लाख, एनएच -६६ ते बिबवणे मांगलेवाडी रस्ता ( ग्रा.मा.-४०७) ३.५०० किमीसाठी २ कोटी ८९ लाख, एसएच -१९१ ते नारूर महालक्ष्मी मंदिर रस्ता ( ग्रा.मा.-२२२) १.८०० किमीसाठी १ कोटी ५४ लाख, नेरूर वाघोसेवाडी रस्ता ( ग्रा.मा.-३५६) ३ किमीसाठी २ कोटी ३९ लाख, नेरूर देसाईवाडी शिरसोंडवाडी रस्ता ( ग्रा.मा.-३६२ & ३६३ ) ३.२९० किमीसाठी २ कोटी ७३ लाख, तेंडोली आदोसेवाडी मुणगी रस्ता ( ग्रा.मा.-३७८ & ३८४) ३.५०० किमीसाठी २ कोटी ७९ लाख, रानबांबुळी वायंगणकरवाडी रेल्वे स्टेशन रस्ता ( ग्रा.मा.-११२) १.६०० किमीसाठी १ कोटी ५९ लाख हि कामे मंजूर झाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय १० मार्च २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे अशी माहितीही आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स