ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्यापासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी ; जिल्हाध्यक्ष अजय शिंदे .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

उद्यापासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी ; जिल्हाध्यक्ष अजय शिंदे .

प्रकाशन: 13 Mar 2023 06:12 PM
वाचन संख्या 95

मालवण | सुयोग पंडित : उद्या १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी असुन संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.
महाराष्ट्रातही अनेक कर्मचार्यांची नवीन पेन्शन योजना रद्द करून ,जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी या संपामध्ये आग्रही मागणी राहणार आहे.

जोपर्यंत जुनी पेन्शन हा मुद्दा मान्य होत नाही तोपर्यंत पुढील मागण्यांची चर्चाही करायची नाही असे एकमुखाने ठरवण्यात आले आहे. अनेक कर्मचारी जुन्या पेन्शन पासून वंचित आहेत म्हणून उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने( फेडरेशन)एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांची राज्य कार्यकारिणीची सभा नाशिक येथे १२ फेब्रुवारीला संपन्न झाली या सभेत दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत बेमुदत संप पुकारण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावावर चर्चा झाली . राज्यव्यापी बेमुदत संपाबाबतच्या ठरावास एकमताने मंजुरी दिली सदर निर्णयानुसार या राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे निश्चित केलेले आहे..

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची ९ मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था ओरोस सभागृहात बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष श्री अजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली या सभेत सर्वानुमते १४ मार्च २०२३ पासून होणाऱ्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी उद्या पासून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग यांना संपात सहभागी होत असल्याबाबत चे संघटनेचे पत्र जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे,सचिव विजय मयेकर यांच्या मार्फत देण्यात आले.
संपादिवशी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ३२ यांना निवेदन देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,ओरोस ,उद्या १४ मार्चला सकाळी साडेदहा वाजता मोर्चा निघणार असून या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्यासाठी रवळनाथ मंदिर ओरस या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे , सचिव विजय मयेकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या संपाबाबतच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी माजी सचिव उमेश सुकी,माजी अध्यक्ष नारायण माने सल्लागार अच्युत वनवे जिल्हा समन्वयक माधव यादव, जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुका अध्यक्ष,सचिव व बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते ,उपस्थित होते.
संप यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षिका संपात सहभागी असले तरी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मस्टरवर सही न करता परीक्षा कामकाजात मदत करण्याचे ठरवण्यात आले, तसेच परीक्षा पेपर तपासणीचे काम करण्यात यावे असेही ठरवण्यात आले, कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात आलेली आहे ,परीक्षेचे काम करत असताना, संपात सहभागी असलेले सर्व शिक्षक मस्टरवर सही करणार नाहीत व संपात पूर्णपणे सहभागी असतील अशा प्रकारचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स