अरे ....गमावले सर्वकालीन श्रेष्ठ समिक्षास्त्र..! (सजीव समीक्षक कमलाकर नाडकर्णी विशेष.)
सुयोग पंडित | मुख्य संपादक : ज्यांना धूमचा अमिर ख़ान माहित आहे किंवा गेलाबाजार दंगलचा आमिर ख़ान माहित आहे त्यांना ‘केसाला तेल पाणी लावलेला’ अमीर ख़ान माहित आहे का विचारा…?
हे ओ.टी.टी.किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सामान उचलण्यात पटाईत असलेल्या लोकांना कमलाकर नाडकर्णी हे नांव माहीत असेल….देव जाणे.
पण मिडिया हेच शिकवतो की जिथे देव जाणत नाही तिथे आपण जाणुया.
आज पटकन् मोबाईलवर काहीतरी तपासून पहायचा काळ नव्हता तो…एका सुप्रसिद्ध वृत्त पत्रात शुक्रवारच्या शुक्रवारीच एखाद्या चित्रपटाचा
‘डिसेक्शन’ करणारा काळ होता तो.
आज प्रामाणिकपणे सांगतोय ..की नुसत्या या चॅनेलचा मुख्य संपादक म्हणून नाही…किंवा भयानक उर्मटपणा दाखवणार्या १९९४ ऑस्करच्या सुलेमान ( सिनेमा : मूकपट पॅलेस्टाईन) पण कमलाकर नाडकर्णी हे ‘समीक्षक ‘ होते …बोचक नाहीत.
“केसाला तेल पाणी लवून आमिर खानने बरं काम केलंय”..किंवा “चिमोट्या तोंडाचा संजय कपूर आणि हरवत चाललेली माधुरी राजामध्ये दिसण्याआधी मी प्रजेत बरा “…ही आणि अशी मिश्किल वाक्ये फक्त कमलाकर नाडकर्णी वापरू शकतात .
जाता जाता सांगतो….
काही समीक्षण म्हणजे डाॅली बिंद्रा करुन चालत नसते तर काही समीक्षणं जी दीर्घकाळ कलेच्या खेळपट्टीवर ठाण मांडतील अशीच असतात आणि हेही सांगतो की आपली सिंधुनगरी चॅनेलचा ‘सिनेपट’ हा प्रकल्प दिवंगत कमलाकर नाडकर्णी यांचेच बीज़ आहे..
कमलाकर नाडकर्णी हे आमचं तेवढंच बालपण आहे आणि कमलाकर नाडकर्णी तेवढचं अजरामर आहेत जेवढे पुलं..
बाकी तुम्ही…आम्ही..”आतंक ही आतंक”….कणेकरीचा फुकटचा
आगाऊपणा नसलेला एक समिक्षास्त्र आपण गमावलंय..एवढं खरं.!
सुयोग पंडित ( मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)