ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणात जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वच्छता उपक्रम.

मालवणात जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वच्छता उपक्रम.

प्रकाशन: 28 Sep 2021 05:40 PM
वाचन संख्या 80

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे संपन्न झाली स्वच्छता सेवेची मोहीम.

मालवण | वैभव माणगांवकर : मालवणातील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे शाश्वत पर्यटनाच्या संदेशासोबतच शहराच्या सौंदर्याचे आणि आरोग्याचे महत्व पटवून देणारी स्वच्छता सेवा मोहीम राबविण्यात आली.   जागतिक पर्यटन दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पर्यटन सप्ताह अंतर्गत आज मालवण बंदर जेटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थी वर्गासह सेवाभावी संस्था देखील सहभागी झाल्या होत्या.

स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले. या साफसफाई मोहिमेस मालवण रोटरी क्लब अध्यक्ष उमेश सांगोडकर व रोटरी सदस्य, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष विश्वास गावकर व लायन्स सदस्य तसेच मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक संतोष लुडबे व सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी आदी व इतर उपस्थित होते.
पर्यटन सप्ताह निमित्त स. का. पाटील महाविद्यालय आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने ही मोहीम बंदर जेटी येथे राबविण्यात आली. यावेळी बंदर जेटी व किनाऱ्यावरील विविध प्रकारचा कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचे नियोजन प्रा. एम.आर. खोत यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शेवटी प्रा. सुमेधा नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स