ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आर्मी स्पोर्टस इन्स्टीट्यूट आणि बाॅईज स्पोर्ट्स कंपनी पुणे यांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन…

आर्मी स्पोर्टस इन्स्टीट्यूट आणि बाॅईज स्पोर्ट्स कंपनी पुणे यांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन…

प्रकाशन: 28 Sep 2021 03:22 PM
वाचन संख्या 142

वैभव माणगांवकर | मालवण : मैदानी खेळांतील सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याची सद्य स्थिती लक्षात घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन दिनांक ४/१०/२०२१ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी करण्यात आलेले आहे.

  आंतरराष्ट्रीय व ॴॅलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडुंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे...

क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांचे संयुक्त विद्यमाने बाॅईज स्पोर्ट्स कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालयाने "क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा" यांच्या नियोजनाखाली केलेले आहे अशी माहिती विजय शिंदे,जिल्हाक्रीडाधिकारी यांनी दिली.

जिल्हा स्तर चाचण्यांचे आयोजन सोमवार दिनांक ४/१०/२१रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे करण्यात आले आहे . सहभागी होणा-या खेळाडुंनी सकाळी नऊ वाजेपर्यंत उपस्थित रहावे..

या चाचणीमध्ये आठ ते चौदा वयोगटातील फक्त मुलांना प्रवेश असुन त्यांचा वयोगट  १/१/२०२२ पर्यंत असणे आवश्यक राहील...

यातिल खेळ खालिल प्रमाणे असतिल..
डायव्हिंग -वयोगट मुले ८ते१२.
ॳॅथलेटीक्स ,बाॅक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी,वेटलिप्टींग-मुले वयोगट १०ते१४.

प्रत्येक खेळानुसार मुलांच्या पाच चाचण्या घेऊन त्यांना त्यांच्या प्राप्त कौशल्यानुसार पाच,चार ,तिन,दोन,एक असे गुणांकन करुन एकुण प्राप्त गुणांमधिल ८०% गुण मिळवणाऱ्या मुलांना विभागीय निवड चाचणी साठी निवडले जाईल असे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा चे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले..

या निवडचाचण्यांचे आयोजन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा करणार असुन सचिव नंदकिशोर नाईक हे याचे प्रमुख म्हणुन काम पहाणार आहेत…*
मैदान‌ अधिकारी म्हणून अजय शिंदे , नंदकिशोर नाईक,जयराम वायंगणकर,संजय परब,अजय सावंत,विजय मयेकर,मारुती माने,दशरथ काळे,सुदीन पेडणेकर,महेश जाधव, श्रीनाथ फणसेकर,पंकज राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील खेळाडू तथा विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे. याच चाचण्यांमध्ये जास्तीतजास्त संख्येने व क्षमतेने उतरुन संधीचा उचित् लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.विजय शिंदे यांनी केले आहे..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स