ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
युवा भजनी गायिका निकिता मेस्त्रीचा मसुरे गावांत सत्कार..!

युवा भजनी गायिका निकिता मेस्त्रीचा मसुरे गावांत सत्कार..!

प्रकाशन: 28 Sep 2021 05:46 PM
वाचन संख्या 426

लहान वयातच निकीताचे भजन क्षेत्रात भरीव योगदान…!

मसुरे | प्रतिनिधी : गानसम्राज्ञी लता मंगेशकरजींच्या वाढदिवसादिवशीच महिला गायन क्षेत्रातील एक गौरवास्पद वार्ता मसुरे गावांतून येत आहे. मसुरे देऊळवाडा येथील युवा महिला भजनी बुवा निकीता बाबाजी मेस्त्री हिने अगदी अल्पावधीतच भजन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसुरे येथे आदर्श शिक्षिका श्रीमती कल्याणी कांबळी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. येथील बागवे हायस्कुलचे कर्मचारी अनिल मेस्त्री यांची निकिता ही कन्या आहे. अल्पावधीत महिला भजन क्षेत्रात केलेल्या गौरवास्पद कामगिरीबद्दल श्रीमती कल्याणी कांबळी यांनी तिचे विशेष कौतुक केले.

मालवण तालुक्यामध्ये महिला भजन क्षेत्रामध्ये ठीक ठिकाणी आपल्या गोड गायकीने निकिता मेस्त्री हिने भजन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. यावेळी भजन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स