ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पावशी महिला विभाग संघटकपदी मृणाल परब तर पिंगुळी महिला विभाग संघटकपदी निर्मला पालकर यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पावशी महिला विभाग संघटकपदी मृणाल परब तर पिंगुळी महिला विभाग संघटकपदी निर्मला पालकर यांची नियुक्ती.

प्रकाशन: 14 Jan 2023 11:19 AM
वाचन संख्या 91

आमदार वैभव नाईक यांनी नियक्ती पत्रे देत केले अभिनंदन

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक कुडाळ येथे आज संपन्न झाली.यावेळी आमदार वैभव नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पावशी विभागाच्या महिला विभाग संघटक पदी मृणाल परब तर पिंगुळी विभागाच्या महिला विभाग संघटक पदी निर्मला पालकर यांची नेमणूक करण्यात आली. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली.


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे शिवसेना कुडाळ तालुका महिला संघटक मथुरा राऊळ, तालुका संघटक स्नेहा दळवी, माजी उपसभापती श्रेया परब, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, श्रुती वर्दम, विभागप्रमुख कन्याश्री मेस्त्री, दर्शना म्हसकर, माणगाव सरपंच मनीषा भोसले, पुळास सरपंच विनया निकम,नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर,पावशी सरपंच वैशाली पावसकर, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर , पोखरण-कुसबे सरपंच समीक्षा जाधव, श्रावणी सावंत, रश्मी वेंगुर्लेकर,सायली सर्वेकर, नाईक आदी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स