खारेपाटण विभागीय अध्यक्ष अनंत चव्हाण यांचे सात्विक दातृत्व ; संत शिरोमणी सेना महाराजांच्या मूर्तीची भेट.
देवगड तालुका नाभिक संघटना तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण आणि सहकार्यांनी व्यक्त केली कृतज्ञता..!
विवेक परब | ब्युरो चीफ : भेट देण्यासाठी काही दानशूर व्यक्ती उत्सुक असतात. एकदा ठरवले की ती भेट दिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. खारेपाटण विभागाचे नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनंत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अनिता चव्हाण या दांपत्याने देवगड तालुक्यातील नाभिकांसाठी संत शिरोमणी सेना महाराज यांची संगमरवरी मूर्ती सस्नेह भेट दिली.
अनंत चव्हाण यांनी मूर्ती देण्याची आपली इच्छा व्यक्त केली. देवगड तालुक्यातील साठ नाभिकांची टिम सेना महाराजांची संगमरवरी मूर्ती आणण्यासाठी पंढरपूर येथे रवाना झाली. देवगड तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण यांनी तालुक्यातील नाभिकांना आवाहन करताच साठ नाभिक बंधुभगिनी मूर्ती आणण्यासाठी थेट पंढरपूर येथे जाण्यासाठी तयार झाले. जाता जाता त्यांनी तुळजापूर , अक्कलकोट , पंढरपूर आणि नरसोबाची वाडी ही तीर्थक्षेत्रे बघण्याची अनमोल संधी घेतली.
खारेपाटण विभागीय अध्यक्ष अनंत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अनिता चव्हाण यांच्या माध्यमातून नाभिक समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि खजिनदार चंद्रशेखर चव्हाण यांनी धन्यवाद दिले आहेत. समस्त कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने दानशूर अनंत चव्हाण यांचे कौतुक करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)