आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी डांबरीकरण निधीचा प्रश्न लागला मार्गी.
आचरा | प्रसाद टोपले : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी येथील डांबरीकरणासाठीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे चिंदर मधील ज्येष्ठ व युवा शिवसैनिक व इतर ग्रामस्थांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुरावा माध्यमातून व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या पपु परूळेकर व सौ.रिया घागरे तसेच आचरा विभाग प्रमुख समिर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, आघाडी मालवण प्रमुख मंगेश गांवकर व इतर विभागीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नांनी चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी डांबरीकरण करणे हा एक महत्वाचा व अत्यावश्यक टप्पा आता या विशेष निधी उपलब्धतेमुळे शक्य झाला आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)