ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोसमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओरोसमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ६० लाखांचा मुद्देमाल जप्त.

प्रकाशन: 13 Jan 2023 07:51 AM
वाचन संख्या 83

बांदा | राकेश परब : शेजारील गोव्यातून मुंबईकडे केल्या जाणार्‍या बेकायदा दारु वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने गुरुवारी सकाळी ओरोस येथे कारवाई केली. या कारवाईत ४८ हजार दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर (एमएच १२ आरएन ४४०३) असा एकूण ६० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी हाशीम कासम शेख (६१, रा. सांताक्रुझ मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल १ हजार दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.
सदर कारवाई विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे व योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स