ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने गरजू बेघर लोकांना दिली ब्लॅंकेटची ऊब..! ( विशेष )
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने गरजू बेघर लोकांना दिली ब्लॅंकेटची ऊब..! ( विशेष )

प्रकाशन: 13 Jan 2023 06:21 AM
वाचन संख्या 453

सावळा विठ्ठल, संत बाळूमामा , पैगंबर मोहम्मद ते प्रभू येशूंची प्रतिकात्मक ‘घोंगडीची’ ओळख घेतलेली संस्था ठरली कोकण संस्था.

बांदा | राकेश परब (विशेष) : ईश्वराच्या विविध रुपांची ओळख घेताना मनुष्याला काही दाखले दिले जातात . विठूमाऊली, संत बाळूमामा, पैगंबर मोहम्मद, प्रभू येशू किंवा अन्य देव देवतांचे वर्णन करताना त्यांच्या सोबत ‘घोंगडी’ असल्याचे वर्णन आपण ऐकत आलेलो आहोत. काय असते ही नेमकी घोंगडी किंवा काय सुचवते ही घोंगडी तथा ब्लँकेट याची ओळख ज्यांना लागते ते आपसुकच कुठलीही धार्मिक कथा न वाचताही ईश्वराच्या जवळचेच अंश असतात असे म्हणणे वावगं ठरणार नाही. ‘ब्लॅकेट’ म्हणजे ऊब आणि ती ऊब त्यांना जास्त आवश्यक असते ज्यांच्या डोक्यावर छप्पर नसते किंवा थंडीपासून बचाव करायच्या भिंती असतात. अशा माणसांना मदत करावी हाच सर्व ईश्वरी संदेश दाखवते ती घोंगडी.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने खर्या अर्थाने या ‘घोंगडी’ मागचा संदेश ओळखून एक संदेशात्मक प्रकल्प राबवला आहे.
सध्या थंडीची लाट देशभर पसरली आहे. पुणे शहराचा पारा देखील ८ अंशच्या खाली घसरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेली लोक राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेला खुल्या आकाशाची चादर ओढून झोपतात. मात्र या काव्यमय वाक्यातील चादर त्यांना ऊब देण्यासाठी पुरेशी नसते.ज्या गुलाबी थंडीत आपल्या सारखे लोक २-२ चादरी ओढून झोपतात अशा गारवटणाऱ्या ऐन थंडीत अनेक कोवळी मुले पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली पाहून मन उद्विग्न तर होतंच. पण अशा थंडीमुळे कित्येक मुले सर्दी, ताप, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला, अशा अनेक विषाणूजन्य आजाराला देखील बळी पडतात हा विचार देखील मनाला सतावतो.
अशा आजारांपासून रस्त्यावरील लोकांना वाचवण्यासाठी आणि थंडीत त्यांच्या लेकरांना मायेची ऊब देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या भागात
कोकण कला व शिक्षण विकास संस्था अशा कष्टकरी बेघर लोकांना उबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप करत असते. यावर्षी ही मुंबईतील दादर परिसर आणि पुणे येथील कात्रज परिसरातील कुडकुडी भरणाऱ्या थंडीत वास्तव्य करणाऱ्याना शेकडो लोकांना मायेची ऊब मिळावी म्हणून संस्थेकडून ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी या वाटपात संस्थेकडून अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. मुंबईतील वाटपात सुरज कदम, साक्षी पोटे, बिना अहिरे, ऋतुजा पवार आणि योगिता निजामकर तर पुणे येथील वाटपात विशाल महांगरे आरती भोज, पूनम सुतार आणि श्वेता जैन यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन कडाक्याच्या थंडीचा देखील अनुभव घेतला.

धर्म माणुसकीचे मर्म आणि कर्म शिकवतो हाच संदेश ओळखलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या या कार्याची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स