ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विलवडे येथील 'राजा शिवाजी विद्यालयाचे' स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विलवडे येथील 'राजा शिवाजी विद्यालयाचे' स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 13 Jan 2023 08:16 AM
वाचन संख्या 59

बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलवडे येथील ‘राजा शिवाजी हायस्कूल’ हे या पंचक्रोशीतील वैभव असून जो इमारतीचा संकल्प शाळेने केलेला आहे तसेच संस्थेने शाळा विकासासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे तसेच या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी केली.
ग्रामोन्नती मंडळ,मुंबई संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडे या माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात पार पडले. यावेळी प्रमोद कामत अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
       या वर्षी दहावी परीक्षेसाठी बांद्याला जाणाऱ्या मुलांची येण्या जाण्याची सोय केली जाईल.तसेच शाळेच्या नूतन इमारतीस आपला खारीचा वाटाही उचलणार असे अभिवचन  कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोंकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दिले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपसभापती विनायक दळवी यांनी ही आपले शाळेला नेहमीप्रमाणे सहकार्य राहील याची ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, संस्था खजिनदार चंद्रकांत दळवी, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, तांबुळी सरपंच वेदिका नाईक,असनीये सरपंच रेश्मा सावंत, माजी सरपंच अभिलाष देसाई, बावळाट सरपंच सोनाली परब, कोनशी सरपंच साधना शेट्ये, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, भालावल उपसरपंच अर्जून परब, विलवडे उपसरपंच विनायक दळवी, सुरेश कदम, गोविंद तांबे, सोनू दळवी, हरिश्चंद्र दळवी, सहदेव दळवी, सुरेश सावंत, प्रदीप दळवी, परेश धरणे, माजी विद्यार्थाी संघटना सचिव रुपेश परब, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, अपर्णा दळवी, शिल्पा धरणे, स्नेहा दळवी, नारायण दळवी सानिका दळवी माजी मुख्याध्यापक एन.एल.सावंत,विद्या मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, सूत्रसंचालन वनसिंग पाडवी, अहवाल वाचन मुकुंद कांबळे तर आभार सुहास बांदेकर यांनी मानले.
यावेळी दशक्रोशीतील उपस्थित सर्वच सरपंच,उपसरपंच, यांचा शाल श्रीफळ  सन्मान करण्यात आला.
यावेळी यावर्षी दहावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त वैष्णवी भानुदास कांबळे, द्वितीय क्रमांक यशश्री दळवी, दीक्षा दळवी, तृतीय क्रमांक पूर्वा गवस यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. आठवी नववी बरोबरच क्रीडा प्रकारात जिल्हा स्थरावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचाही गौरव करण्यात आला. यावेळी मुकुंद कांबळे सरांनी शाळेचा वार्षिक अहवाल वाचन करताना शाळेचे प्रगती पुस्तकच उपस्थितांच्या समोर ठेवले.
यानंतर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे मुलांचे गुणदर्शन पर सांस्कृतिक कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु होते . मुलांच्या कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात
आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स