ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुफार्मा-सिंधुदुर्ग वैद्यकिय प्रतिनिधी आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न..!!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुफार्मा-सिंधुदुर्ग वैद्यकिय प्रतिनिधी आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न..!!

प्रकाशन: 09 Jan 2023 02:49 PM
वाचन संख्या 309

कुडाळ । देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधूफार्मा आयोजित , सिंधुदुर्ग वैद्यकीय प्रतिनिधी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात वैद्यकीय प्रतिनिधी परिवारातील पाच संघानी भाग घेतला होता.त्यात कणकवली वॉरियर्स , सिंधुदुर्ग वॉरियर्स , रायझिंग स्टार सिंधुदुर्ग , यक्षिणी माणगाव , सिंधुफर्मा संघ यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भोजनाची व्यवस्था आयोजक कडून करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन श्री अरविंद मुंज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून श्री रामचंद्र शृंगारे सहदेव बहिरे , प्रमोद सावंत , परेश नार्वेकर , प्रकाश निकम , अनंत दळवी व दळवी बंधू (अंब्राड) यांनी काम पाहिले. ही स्पर्धा भगवती अंब्राड मैदान वर झाली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग वॉरियर्स संघ तर द्वीतीय क्रमांक सिंधुफर्मा संघ यांनी मिळवला यात उत्कृष्ट फलंदाज- कृपेश धुरी ,उत्कृष्ट गोलंदाज- विजय टिलवे , अंतिम सामना सामनावीर – संदेश तंबोलकर तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून राघवन मराठे , संदेश तंबोलकर आणि मालिकावीर म्हणून वामन कावले ठरला. तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर म्हणून मेडल देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री संजय घाडीगावकर साहेब , श्री सूर्यकांत नाईक , सचिन कांबळी , सुमित सामंत, सचिन आपटे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी दत्ता देसाई , श्री परब , श्री सरंगले , उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख म्हणून विजय दळवी यांनी काम पाहिले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स