कणकवली विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या मागणीला यश......!
केटी बंधाऱ्याला प्लेट टाकल्यामुळे पाणी पात्रात वाढ.
विवेक परब/ ब्यूरो चिफ : विरोधी नगरसेवक सुशांत नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. कणकवली शहरातील केटी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवा. अशी मागणी सुशांत नाईक यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी काही दिवसापूर्वी लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती.
लघु पाटबंधारे विभागाने केटी बंधाऱ्याला प्लेट टाकून पाणी अडवण्यात आलेलं आहे. नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी प्लेट टाकून अडवल्यामुळे याचा फायदा आता कणकवली शहरातील बिजलीनगर व कणकनगर वासियांना होणार आहे. कणकवली शहरातील जलस्रोतांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)