ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) कुडाळ प्रकल्पांतर्गत तालुका संघटनेने आमदार वैभव नाईक यांची घेतली भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) कुडाळ प्रकल्पांतर्गत तालुका संघटनेने आमदार वैभव नाईक यांची घेतली भेट.

प्रकाशन: 03 Jan 2023 07:48 PM
वाचन संख्या 106

कुडाळ | देवेंद्र गावडे : अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) कुडाळ प्रकल्पांतर्गत तालुका संघटनेने मंगळवारी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत लक्ष वेधले. सरकारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडावे, अशी मागणी यावेळी आमदार नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही आमदार नाईक यांनी यावेळी दिली.
आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत. सध्या प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. २०१८ पासून गेली ५ वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो, आश्वासनापलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा ॲप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. २०१८ ला आम्हांला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी बहुतांशी मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खासगी मोबाईल वापरा म्हणतात, कारवाईच्या धमक्या देतात, आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात. १५ नोव्हेंबरला मुंबई विधानसभेवर अंगणवाडी कृती समितीने मोर्चा नेला. दिवाळीपूर्वी मानधनवाढ करणार असे सांगणा-या महिला व बालविकास मंत्री नाम. मंगलप्रभात लोढा यांनी मोर्चासमोर येऊन एक महिन्याची मुदत द्या. आपण मानधनवाढ देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पुढे काहीच झाले नाही म्हणून, नागपूर विधानसभेवर २७ डिसेंबरला मोर्चा नेण्यात आला. तिथेही आपण सकारात्मक आहे, मुख्यमंत्र्यांना भेटा असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्यावा. दरम्यानच्या कालावधीत किमान वेतन सेविकांना व मिनी सेविकांना १८ हजार रुपये, मदतनीसना १५ हजार रुपये दरमहा द्यावेत. सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत. पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे. कुपोषण रोखण्यासाठी आहाराचे आत्ताचे दर तिप्पट करावेत. अंगणवाडी कर्मचा-यांची सध्या भरती प्रक्रीया बंद करण्यात आल्याने रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशा आमच्या विविध मागण्या आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी आ.नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आ.नाईक यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या मागण्यांबाबत न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी संघटनेच्या कुडाळ अध्यक्षा दिपाली पठाणी, मानसी पाटकर, शैलजा कांबळी, निता पवार, प्रभावती घाडी, सरिता घाडी आदींसह अंगणवाडी कर्मचारी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, विकास कुडाळकर, कृष्णा धुरी, उदय मांजरेकर, रूपेश पावसकर, योगेश धुरी, सचिन काळप, मिलिंद नाईक, संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स