ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिडवणे नं.१ शाळेत बालिका दिन संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिडवणे नं.१ शाळेत बालिका दिन संपन्न.

प्रकाशन: 03 Jan 2023 07:41 PM
वाचन संख्या 58

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिडवणे नं.१ शाळेत आज बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बंडू कोकाटे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
श्रेया पाळेकर हिने झाशीची राणी, सेजल भोवड हिने सिंधुताई सकपाळ, शुभ्रा पांचाळ हिने सावित्रीबाई फुले, तनिष्का पाटणकर हिने डॉ. आनंदीबाई जोशी, श्रावणी भोवड हिने अहिल्याबाई होळकर असा भूमिका अभिनय केला. मान्यवरांच्या हस्ते वेशभूषा घेतलेल्या बालिकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, उपाध्यक्षा समिता सुतार, मनोहर कोकाटे, अनिल पांचाळ, दिनेश रांबाडे, तारीफ शेख, सचिन टक्के, निलेश टक्के, श्रीराम पाष्टे, मंगेश सुतार, स्नेहा पांचाळ, सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर आणि पालकवर्ग उपस्थित होते. प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स